शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:05+5:302021-07-29T04:20:05+5:30

बंधारा वाहू लागला! अकोला : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ...

Applications invited from farmers! | शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले!

शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले!

बंधारा वाहू लागला!

अकोला : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वसंत बंधारा वाहू लागला असून, परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले.

तो खड्डा जीवघेणा!

अकोला : शहरातील सरकारी बगीचा ते खोलेश्वर दरम्यान रस्त्यावर खड्डा पडला आहे. वळण रस्त्यावर हा खड्डा असून, लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहे. भरधाव वाहन आल्यास हा खड्डा जीवघेणा ठरू शकतो.

शिवशाहीला प्रतिसाद नाही!

अकोला : येथील आगार क्रमांक २ मधून पुणे, अमरावती, औरंगाबाद मार्गावर शिवशाही बसेस सुरू आहे; परंतु या बसेसना प्रवासी मिळत नाही. त्यामुळे बसेस कमी प्रवासी संख्येने सुरू आहे.

नाल्या नसल्याने पसरली दुर्गंधी

अकोला : शहरातील खडकी भागात नाल्या नसल्याने घरातील सांडपाणी रस्त्यांवर येत आहे. त्यामुळे जागोजागी गटारे साचली असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Applications invited from farmers!