शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पोलीस दलात खळबळ! महिला आरोपीकडे मुलीची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन

By सचिन राऊत | Updated: April 1, 2026 12:13 IST

Akola Police Suspension News: अकोला सायबर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने महिला आरोपीकडे मुलीची मागणी केल्याने त्याचे निलंबन करण्यात आले आहे. ८० लाखांच्या फसवणूक प्रकरणातील ही धक्कादायक घटना.

- सचिन राऊत 

अकोला : सायबर पोलिसांनी ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. यामध्ये एका महिला आरोपीचा समावेश आहे. अटकेतील महिलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव दहा हजार रुपये देतो' आणि गुन्ह्यातून वाचविण्यासाठी प्रयत्नही करतो अशी अजब गजब मागणी बुधवारी सकाळी केली. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर जाताच त्यांनी तातडीने दखल घेत राजेश जाधव याचे तडकाफडकी निलंबन केले आहे.सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळवत सायबर पोलिसांनी तब्बल ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा छडा लावत पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत एका महिला आरोपीचाही समावेश असून, प्राथमिक तपासात या टोळीने विविध माध्यमांतून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. अटकेतील महिला आरोपीशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने अत्यंत अयोग्य वर्तन करत ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला दहा हजार रुपये देतो’ अशी अमानवी व लज्जास्पद मागणी केल्याचा आरोप पुढे आला आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित महिलेला गुन्ह्यातून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आमिषही दाखविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या कृत्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा सतर्क असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. मात्र, तपास प्रक्रियेतच काही अधिकाऱ्यांकडून होणारे असे गैरवर्तन गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Akola Police Inspector Suspended for Demanding Girl from Female Accused

Web Summary : Akola police inspector suspended after demanding the daughter of a female accused in exchange for money and help with her case. The cyber police had arrested her in connection with an 8 million rupee fraud case. An investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी