कुणीही या; अन् दाखला घेऊन जा!
By Admin | Updated: April 18, 2016 02:21 IST2016-04-18T02:21:22+5:302016-04-18T02:21:22+5:30
गुरांच्या बाजारातील वास्तव: पाहणीविनाच मिळतोय जनावर मालकीचा दाखला; ओळखपत्राकडे दुर्लक्ष.
_ns.jpg)
कुणीही या; अन् दाखला घेऊन जा!
संतोष वानखडे / वाशिम
चोरीच्या जनावर विक्रीला पायबंद बसावा, जनावर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी सहकार व पणन विभागाने घालून दिलेल्या नियमांकडे जिल्हय़ातील कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकारे 'लोकमत स्टिंग' ऑपरेशनद्वारे समोर आला आहे. कोणतीही शहानिशा न करता जनावर मालकीचा दाखला बिनधास्त दिला जात असल्याने, चोरीची जनावरेही खपविली जात असल्याची साधार शक्यता व्यक्त होत आहे.
रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व मानोर्याच्या गुरांच्या बाजारात ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान जनावर मालकीच्या दाखल्याची कोणतीही शहानिशा न करता ह्यखरेदी-विक्रीह्णच्या व्यवहारावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जात असल्याचे दिसून आले.
वाशिम जिल्हय़ात बाजार समिती व उपबाजारातून जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. चोरीच्या जनावरांच्या विक्रीला रोक लावणे आणि चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविणे या दुहेरी उद्देशाने सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवकाने दिलेला जनावर मालकी हक्काचा दाखला पशुपालकाने सोबत आणणे बंधनकारक आहे. जनावर खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर बाजार समितीमधून जनावर घेणार्याला अधिकृत दाखला घ्यावा लागतो. असा दाखला देताना संबंधितांनी सरपंच किंवा पोलीस पाटलाचा दाखला, ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड पाहणे आवश्यक आहे. वर्णन केलेल्या जनावरांची खात्री म्हणून पाहणी करणेही आवश्यक आहे. या नियमाला गुरांच्या बाजारात पायदळी तुडविले जात असल्याची माहिती 'लोकमत' चमूला मिळाल्याने बाजाराच्या दिवशी रिसोड, मालेगाव, वाशिम येथे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या. जनावर खरेदी-विक्री करणार्या इसमांची कोणतीही खातरजमा केली जात नाही, ओळखीचा पुरावा न मागताच जनावराच्या खरेदी-विक्रीचा अधिकृत दाखला दिला जात असल्याचे दिसून आले. अधिकृत दाखल्यामुळे चोरीच्या जनावरांची वाहतूक कशी रोखावी, असा प्रश्न पोलीस प्रशासनाला पडला आहे.