शहरात महास्वच्छता अभियान!
By Admin | Updated: January 26, 2016 02:26 IST2016-01-26T02:26:24+5:302016-01-26T02:26:24+5:30
आयुक्त, महापौरांसह नगरसेवकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.

शहरात महास्वच्छता अभियान!
अकोला : प्रजासत्ताक दिनाच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरात महापालिकेच्या वतीने ह्यमहास्वच्छता अभियानह्ण राबविण्यात आले. मनपा कार्यालयापासून ते मुख्य व अंतर्गत रस्त्यांपर्यंत सर्वत्र एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पदाधिकारी आणि अधिकार्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अकोलेकरांना शहर स्वच्छ ठेवण्याबाबत संदेश दिला. अकोला महापालिका क्षेत्रात सोमवारी सकाळी ७ ते १२ या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मनपा कार्यालये, पाणीपुरवठय़ाच्या जागा, शाळा, दवाखाने, झोन कार्यालये, मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील कचरा या अभियानादरम्यान स्वच्छ करण्यात आला. या अभियानात महापौर उज्जवला देशमुख यांच्यासह मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सहभाग घेतला होता. आयुक्तांनी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्यासह या अभियानाची पाहणी केली. स्वच्छतेबाबत त्यांनी कर्मचार्यांना सूचनाही दिल्यात.