कोरोनाचा आणखी एक बळी, नव्या रुग्णांची भर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 18:42 IST2021-08-17T18:41:50+5:302021-08-17T18:42:00+5:30
Corona Cases in Akola : मंगळवारी आणखी एक रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींचा आकडा ११३६ झाली आहे.

कोरोनाचा आणखी एक बळी, नव्या रुग्णांची भर नाही
अकोला : कोरोनामुळे जिल्ह्यात मंगळवारी आणखी एक रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींचा आकडा ११३६ झाली आहे. गत २४ तासात कोणत्याही नव्या रुग्णाची भर पडली नाही. दरम्यान, आणखी चौघांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब समोर आली. कोरोनावर उपचार घेत असलेल्या मूर्तिजापूर येथील एका ८० वर्षीय महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. या महिलेस ३ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून प्राप्त २२२ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी दिवसभरात झालेल्या रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्येही कुणी पॉझिटिव्ह आढळून आला नाही.
३० ॲक्टिव्ह रुग्ण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, तर खासगी रुग्णातील एक अशा चौघांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ५६,६४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १,१३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.