शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ४० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:45 IST

CoronaVirus News आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २९२ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २९२ झाली आहे. दरम्यान, आणखी ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३८५ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये न्यू खेतान नगर येथील चार, आदर्श कॉलनी व कीर्ती नगर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, गीता भवन, व्ही एच बी कॉलनी गोरक्षण रोड, महसूल कॉलनी, राम नगर, सत्यदेव नगर, मूर्तिजापूर, नांदखेड ता. अकोट, पंचशील नगर, गोडबोले प्लॉट, किनखेड पूर्णा ता. अकोट, धामना ता. अकोट, गोरक्षण रोड, शंकर नगर, जवाहर नगर, रामदास पोलीस क्वॉर्टर, लहान उमरी, वाशिम बायपास, सातव चौक, बळवंत कॉलनी, जीएमसी हॉस्टेल, तेल्हारा, जीएमसी, कौलखेड, जिल्हा परिषद कॉलनी खडकी, अकोट व बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

पारस येथील पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील ६६ वर्षीय पुरुषाचा रविवारी मुत्यू झाला. त्यांना २० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

६४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९३८५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८४४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला