अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३० नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 16:19 IST2021-01-13T16:19:28+5:302021-01-13T16:19:34+5:30
CoronaVirus News आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३२६ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३० नवे पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, १३ डिसेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३२६ झाली आहे. आरटीपीसआर चाचण्यांमध्ये आणखी ३० पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधीतांची संख्या ११,००६ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २९७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये आदर्श कॉलनी येथील चार, मित्रा नगर व कमल टॉवर जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, मोठी उमरी, जठारपेठ व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर मलकापूर, जुने शहर, जांवसु ता. बार्शीटाकळी, धामनदरी ता. बार्शीटाकळी, गोरक्षण रोड, बेसेन रिंगरोड, पाथर्डी ता. तेल्हारा, शंकर रोड, साने गुरुजी नगर, कैलास नगर, तरोडा ता. अकोट, जवाहर नगर, न्यू महसूल कॉलनी व न्यू तापडीया नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
८३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
बुधवारी गुरुदत्त नगर, डाबकी रोड येथील ८३ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना ५ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
६३३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,००६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.