कोरोनाचा आणखी एक बळी, ५५ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:46+5:302021-02-05T06:15:46+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित ...

Another victim of Corona, 55 new positive | कोरोनाचा आणखी एक बळी, ५५ नवे पॉझिटिव्ह

कोरोनाचा आणखी एक बळी, ५५ नवे पॉझिटिव्ह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित १९५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, गोरक्षण रोड येथील तीन, डाबकी रोड, मोठी उमरी, कौलखेड, मिट क्लासेस व पैलपाडा येथील प्रत्येकी दोन, लहान उमरी, बाळापूर, बोरगाव मंजू, पिंपळे नगर, शेलू बोंडे ता. मूर्तिजापूर, न्यू तापडीया नगर, रामनगर, गायगाव बाळापूर, कौलखेड जहांगीर, आंबेडकरनगर, पातूर, कपिलवस्तू नगर, गजानन पेठ, एमजी रोड, भंडारज बु., रणपिसेनगर, शास्त्रीनगर, वैकेटेशनगर, ज्योतीनगर, सिंधी कॅम्प, कोठारी वाटिका, विवरा कॉलनी, तापडीया नगर, म्हैसपूर, छावा व राम मंदिर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

अकोट येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

रविवारी शनिवारपुरा, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचारदरम्यान मुत्यू झाला. त्यांना ३० जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

१७ जणांना डिस्चार्ज

रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, अवघते हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, अशा एकूण १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

७२४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल १०,५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another victim of Corona, 55 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.