कोरोनाचा आणखी एक बळी, ३९ पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:38+5:302021-01-22T04:17:38+5:30
६६ वर्षीय महिलेचा मृत्यू गुरुवारी लक्ष्मीनगर, खदान, अकोला येथील ६६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १४ जानेवारी रोजी ...

कोरोनाचा आणखी एक बळी, ३९ पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त
६६ वर्षीय महिलेचा मृत्यू
गुरुवारी लक्ष्मीनगर, खदान, अकोला येथील ६६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १४ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३६ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ११, हॉटेल स्कायलार्क येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १० अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६१५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,२८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,३३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६१५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.