आणखी एक बळी; २० नवे पॉझिटिव्ह, १२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:17+5:302021-01-02T04:16:17+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात २६९ चाचणी अहवाल प्राप्त झाले, यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Another victim; 20 new positives, 12 corona free | आणखी एक बळी; २० नवे पॉझिटिव्ह, १२ कोरोनामुक्त

आणखी एक बळी; २० नवे पॉझिटिव्ह, १२ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात २६९ चाचणी अहवाल प्राप्त झाले, यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट, न्यू खेताननगर व गोरक्षणरोड येथील प्रत्येकी दोन, तर कमल सोसायटी, कौलखेड, बार्शीटाकळी, कैलासनगर, कुटासा, ता. अकोट, जोगळेश्वर, तारफैल, राऊतवाडी, मनकर्णा प्लॉट, खडकी व अकोला फैल येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

अकोट येथील ७७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या अकोट येथील ७७ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

४२७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १० हजार ५०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९ हजार ७५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another victim; 20 new positives, 12 corona free