आणखी एका कच्चा कैद्याचा मृत्यू
By Admin | Updated: March 24, 2015 00:36 IST2015-03-24T00:36:01+5:302015-03-24T00:36:01+5:30
अकोला मध्यवर्ती कारागृहातील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद.
_ns.jpg)
आणखी एका कच्चा कैद्याचा मृत्यू
अकोला - मध्यवर्ती कारागृहात एका कच्चा कैद्याचा सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहता मिल मरघट परिसरातील रहिवासी फारूक रशीद पठाण (२९) या आरोपीस शुक्रवारी अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून फारुख कारागृहात होता. सोमवारी सकाळी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर फारुख पठाण याचा मृतदेह यवतमाळ येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी फारुख पठाणची पत्नी शाइस्ता यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. *कारागृहात कैद्याच्या मृत्यूची चौथी घटना मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी वाशिम जिल्हय़ातील मानोरा येथील राठोड, बाळापूर येथीलगुलाम जाफर आणि शेख साजिद शेख सुलतान या कैद्याचा मृत्यू झाला होता.