तोफ चोरीप्रकरणी आणखी एकाला अटक

By Admin | Updated: December 28, 2014 23:50 IST2014-12-28T23:50:37+5:302014-12-28T23:50:37+5:30

पाचवा संशयित बोराकेडी बावला येथून अटक.

Another person was arrested for the theft | तोफ चोरीप्रकरणी आणखी एकाला अटक

तोफ चोरीप्रकरणी आणखी एकाला अटक

सिंदखेडराजा (बुलडाणा) : राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तुसंग्रहालयातून चोरी गेलेल्या पंचधातूच्या तोफप्रकरणी पोलिसांनी शनिवारी पाचव्या संशयिताला बोराकेडी बावला येथून अटक करण्यात आली. जगन किसन खरात असे या पाचव्या संशयिताचे नाव आहे. राजवाड्यात दर्शनी भागात लाकडी गाड्यांवर दोन तोफा ठेवलेल्या होत्या. त्यापैकी एक तोफ २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरीस गेली होती. याप्रकरणी मुख्य संशयित बालू जगन्नाथ म्हस्के (३१), शंकर शिवाजी केवट (२0), आकाश पंजाबराव निलख (२0), निमगाव वायाळ व सिद्धार्थ नामदेव काळे (२२) या चौघांना याआधी अटक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तोफ विक्रीचा कट असू शकतो, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी जगन खरात याच्याकडून ट्रॅक्टर व विना क्रमांकाची मोटारसायकलही जप्त केली.

Web Title: Another person was arrested for the theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.