शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’च्या बांधणीतून ‘सोशल इंजिनिअरिंग’चा दुसरा प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:40 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या बांधणीतून वेगवेगळ्या वंचित समूहांना जोडण्याचा ‘सोशल इजिनिअरिंग’चा दुसरा प्रयोग राबविण्यात येत आहे.

- संतोष येलकर

अकोला: भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत, राज्यात वंचित बहुजन आघाडीची पक्ष बांधणी सुरू करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या बांधणीतून वेगवेगळ्या वंचित समूहांना जोडण्याचा ‘सोशल इजिनिअरिंग’चा दुसरा प्रयोग राबविण्यात येत आहे.बहुजन समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी यापूर्वी अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाची निर्मिती केली. अकोल्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भारिप -बमसंचे पक्ष संघटन उभे करण्यात आले. बहुजन महासंघाच्या माध्यमातून बहुजन समाजातील विविध घटकांना सोबत घेण्याच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या या पहिल्या प्रयोगात बहुजन समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन पक्षसंघटन वाढविण्यात भारिप-बमसंला यश मिळाले. त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली असून, वंचित बहुजन आघाडीच्या नावानेच राज्यात लोकसभा निवडणूक लढविण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून, राज्यात वंचित बहुजन आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हानिहाय ‘वंचित’च्या कार्यकारिणी गठित करण्याचे कामही सुरू करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हानिहाय कार्यकारिणींमध्ये वेगवेगळ्या वंचित घटकातील कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेच्या कामाची संधी देण्यात येत आहे. त्यानुषंगाने वंचित घटकांना सोबत घेऊन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या बांधणीतून राज्यात ‘सोशल इंजिनिअरिंग’चा दुसरा प्रयोग राबविण्यात येत आहे.विदर्भातील नऊ जिल्ह्यांत ‘वंचित’च्या कार्यकारिणी गठित!राज्यात वंचित बहुजन आघाडीची पक्ष बांधणी सुरू करण्यात आली असून, जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात येत आहेत. त्यामध्ये १७ आॅगस्टपर्यंत विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली इत्यादी नऊ जिल्ह्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आल्या आहेत. कार्यकारिणीमध्ये वेगवेगळ्या वंचित समूहातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात येत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रदेश प्रमुख राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोला