आणखी एकाचा मृत्यू, ११३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST2021-03-09T04:21:19+5:302021-03-09T04:21:19+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०७३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

आणखी एकाचा मृत्यू, ११३ कोरोना पॉझिटिव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०७३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९९७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील सहा, स्वाद बेकरी येथील पाच, जीएमडी मार्केट, कौलखेड, रामदासपेठ व भंडारज बु. येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, खडकी, कान्हेरी सरप, व्हीएचबी कॉलनी, गीता नगर, शास्त्री नगर, राम नगर, जठारपेठ, लाल बंगला, रेल्वे स्टेशन चौक, गोडबोले प्लॉट व बाळापूर प्रत्येकी प्रत्येकी दोन, तर पातूर, आदर्श कॉलनी, बाळापूर रोड, लाखोडा, रायझिंग सन हॉटेल, बिर्ला कॉलनी, सिंधी कॅम्प, आळंदा, पोलिस हेडक्वॉर्टर, गोरक्षण रोड, मलकापूर, सावंतवाडी, हिंगणा फाटा, गांधी रोड, आरटीओ रोड, वाशिम बायपास, जयहिंद चौक, बाळापूर नाका, तारफैल, मुझफरपूर, खोलेश्वर, दगडी पूल, नायगाव, बैदपुरा, पातूर, रजपूतपुरा, जीएमसी, मोठी उमरी व बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रविनगर, अकोला येथील ६१ वर्षीय पुरुष रुग्णाचा सोमवारी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. त्यांना १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
१५३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील १६, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील सहा, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, अवघाते हॉस्पिटल येथून एक, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून १६, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून दोन, नवजीवन हॉस्पिटल येथून दोन, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, बॉईज हॉस्टेल अकोला येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील २९ अशा एकूण १५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४,७३८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,२३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,१०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,७३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.