शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

महाबीज पतसंस्थेतील घोटाळ्यात आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:26 IST

अकोला: महाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत अपहार झाल्याप्रकरणी शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशानंतर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोला: महाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत अपहार झाल्याप्रकरणी शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशानंतर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदारी कारवाई पतसंस्थेच्या तत्कालीन सचिव व लिपिकावर करण्यात आली. महाबीजमध्ये दोन विविध घोटाळे करण्यात आले असून, एकामध्ये ७४ लाखांचा तर दुसऱ्या अपहार प्रकरणात १७ लाखांचा घोळ झाला आहे.शेतकºयांची नुकसान भरपाई वितरण प्रक्रियेत घोटाळा करण्यात आला. बोगस दस्तऐवजही सादर करण्यात आले. त्यानंतर आता पतसंस्थेत बनावट पावत्या अािण बिल बुकांच्या आधारे अपहार झाल्याचे पुढे आले आहे. याबाबत अंकेक्षण अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर २० एप्रिल २०१७ रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली; मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे ३ एप्रिल २०१८ रोजी पतसंस्थेकडून पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले; मात्र कारवाई न झाल्याने कलम १५६/३ अन्वये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणी विलास नानासाहेब देशमुख (तत्कालीन सचिव) व प्रभाकर अभिमान तराळे यांची नावे पुढे आली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी भारतीय दंड विधानाच्या कलम ४०८, ४०९, ४२०, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोटाळ्याची दोन प्रकरणेमहाबीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेत अपहाराची दोन प्रकरणे वेगवेगळ्या कालावधीत घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१४-१५ मध्ये ७४ लाख २१ हजार आणि २०१५-१६ मध्ये १७ लाख १७ हजारांचा घोळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंकेक्षण अहवालामध्ये हे घोटाळे उघड झाले असून, आता पोलीस तपासात या घोटाळ्याची पाळेमुळे समोर येणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजCrime Newsगुन्हेगारी