अकोला जिल्ह्यात आणखी ६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:40 IST2020-09-21T12:40:42+5:302020-09-21T12:40:50+5:30
सोमवार २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ६९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६६०२ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात आणखी ६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ६९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६६०२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २५६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८७ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १३ जणांसह, जठारपेठ, डाबकीरोड, प्रसाद कॉलनी येथील प्रत्येकी पाच, निमवाडी येथील चार, जुने शहर येथील तीन, तुकाराम चौक, खोलेश्वर, आनंदनगर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, शिवर-शिवणी, तारफैल, कमला नगर, वानखडे नगर, महाराजा अग्रसेन भवन जवळ, कमला प्लॉट, कान्हेरी गवळी, अकोट, चोहट्टा बाजार, पळसो बढे, दुर्गा चौक, खिरपुरी खुर्द, शरद नगर, अकोला, तिवसा, झोडगा, राधेनगर, पिंजर, रामनगर, रतनलाल प्लॉट, मलकापूर रोड, दहातोंडा, हातगाव, राजुरा घाटे, सांगवा मेळ येथील प्रत्येकी एक अशा एकूण ६९ रुग्णांचा समावेश आहे.
१६६१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२०२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४७३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १६६१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.