विभागासाठी कोविशिल्डचे आणखी ५८ हजार ८०० डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:10+5:302021-03-21T04:18:10+5:30
विभागात सुरू असलेल्या तिसर्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी पुन्हा लसींचे ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्ड लसीचा ...

विभागासाठी कोविशिल्डचे आणखी ५८ हजार ८०० डोस!
विभागात सुरू असलेल्या तिसर्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी पुन्हा लसींचे ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्ड लसीचा हा साठा शुक्रवारी, १९ मार्चला रात्री अकोल्यात दाखल झाला असून शनिवारी जिल्हानिहाय वितरण करण्यात आले अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटातील विविध आजारांनी ग्रस्त असणार्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. याबरोबरच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील डोसही देण्यात येत आहेत. त्यामुळे लशींची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विभागासाठी महिन्यातून दोन वेळा लस प्राप्त होत आहे. शुक्रवारी रात्री ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत.
जिल्हा निहाय प्राप्त लस
जिल्हा - उपलब्ध लस साठा
अमरावती - १५६८०
वाशिम - ५७२०
बुलडाणा - १३७००
अकोला - ९५४०
यवतमाळ - १४३४०