अकोला जिल्ह्यात आणखी ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 13:08 IST2020-12-04T13:08:08+5:302020-12-04T13:08:25+5:30
CoronaVirus News आणखी ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ९५८१ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात आणखी ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी आणखी ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ९५८१ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी ३२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित २७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मध्यवर्ती कारागृहातील १३ जणांसह गोरक्षण रोड, बसेरा कॉलनी, शास्त्री नगर, रणपिसे नगर व गीता नगर येथील प्रत्येकी तीन, गणेश नगर, जुने शहर, मोठी उमरी, राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, तर भारती प्लॉट, तेल्हारा, वल्लभ नगर, जठारपेठ, आदर्श कॉलनी, किनखेड पूर्णा, अडगाव बु. ता. तेल्हारा, बाजोरिया नगर, बिर्ला कॉलनी, व्यंकटेश नगर, जीएमसी बॉय हॉस्टेल, तुकाराम चौक, न्यू जैन मंदिर, व्याळा ता. बाळापूर, कान्हेरी सरप ता. बार्शीटाकली, राउतवाडी व बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८६६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.