आणखी ५० पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:01+5:302021-01-04T04:17:01+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ४४३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९८ ...

Another 50 positive, 22 corona free | आणखी ५० पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त

आणखी ५० पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ४४३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षणरोड येथील सात, छोटी उमरी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गांधी चौक येथील चार, गड्डम प्लॉट चांडक मंगल कार्यालयजवळ व अकोट येथील प्रत्येकी तीन, तहसील ऑफिस, हिंगणारोड, जीएमसी हॉस्टेल, अलंकार मार्केट, खडकी, आळंदा ता. बार्शिटाकळी, जळगाव नाहाटे ता. अकोट, बेलुरा, ता. अकोट, हरिहर पेठ, तऱ्हाळा, नकाशी, ता. बाळापूर, काँग्रेसनगर, कोठारी वाटिका मलकापूर, न्यू तापडियानगर, खुफीया अपार्टमेंट, आदर्श कॉलनी, राजपूतपुरा व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

२२ जणांना डिस्चार्ज

रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून चार, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून चार, तर ओझोन हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सात अशा एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४४५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,५८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८२१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४४५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 50 positive, 22 corona free