दरम्यान, आणखी १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ४२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जिल्हा परिषद कॉलनी खडकी येथील चार, कच्ची खोली येथील तीन, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, जवाहरनगर व अडसूल निंब फाटा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सिव्हिल लाइन, आश्रयनगर, पारस, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोट, आदर्श कॉलनी, नानकनगर, मुर्तिजापूर रोड, गणेशनगर, खडकी, जठार पेठ, कौलखेड, गीतानगर, रामदास पेठ व डाबकी रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
१२ जणांना डिस्चार्ज
बुधवारी बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले सहा अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५४३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,७३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८६९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.