अकोला जिल्ह्यात आणखी ३२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:32 IST2021-02-06T12:32:32+5:302021-02-06T12:32:37+5:30
corona virus news आणखी ३२ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,७८४ वर पोहोचली आहे.

अकोला जिल्ह्यात आणखी ३२ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३२ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,७८४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खदान, तेल्हारा, अकोट, शिवपूर, कान्हेरी सरप व दुर्गा चौक येथील प्रत्येकी दोन, राउतवाडी, खेतांन नगर, श्रीवास्तव चौक, जेल क्वॉटर, गुडधी, मराठा नगर, बार्शीटाकली, जवाहर नगर, किर्ती नगर, लहान उमरी, राम नगर, रतनलाल प्लॉट, वणी रंभापुर, मूर्तिजापूर, रणपिसे नगर, डाबकी रोड, बाळापूर, जळगाव नहाटे ता. अकोट, वानखडे नगर व देशमुख फाईल येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७८४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,७८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.