अकोला जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 12:53 IST2021-01-06T12:50:25+5:302021-01-06T12:53:35+5:30
CoronaVirus News आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५४८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

अकोला जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे सत्र सुरुच असून, बुधवार (६ जानेवारी) रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३१ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०,७२८ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जिल्हा परिषद कॉलनी खडकी येथील चार, कच्ची खोली येथील तीन, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, जवाहर नगर व अडसूल निंबफाटा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सिव्हील लाईन, आश्रय नगर, पारस, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोट, आदर्श कॉलनी, नानक नगर, मुर्तिजापूर रोड, गणेश नगर, खडकी, जठारपेठ, कौलखेड, गीता नगर, रामदास पेठ व डाबकी रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
५४८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,७२८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५४८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.