अकोला जिल्ह्यात आणखी ३० पॉझिटिव्ह, ३४ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 17:43 IST2021-01-30T17:42:47+5:302021-01-30T17:43:09+5:30
CoronaVirus News आणखी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,५६६ वर गेली आहे

अकोला जिल्ह्यात आणखी ३० पॉझिटिव्ह, ३४ जणांची कोरोनावर मात
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडीत होण्याचे नावच घेत नसून, शनिवार ३० जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,५६६ वर गेली आहे. दरम्यान, ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे २९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये राउतवाडी येथील चार, तोष्णीवाल लेआऊट, गोकुल कॉलनी व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड येथील दोन, जठारपेठ,भागवती नगर, आदर्श कॉलनी, बार्शीटाकळी, केशव नगर, वानखडे नगर, सिंधी कॅम्प, आळशी प्लॉट, तुकाराम चौक, किर्ती नगर, खदान, शेलू वेताळ ता. मूर्तिजापूर, काला चबुतरा, मलकापूर व जुने शहर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
३४ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २१ अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६८४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,५६६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.