अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 17:03 IST2021-01-17T17:03:11+5:302021-01-17T17:03:34+5:30
CoronaVirus News आणखी २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,१४८ वर पोहोचली आहे.

अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, रविवार, १७ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,१४८ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २९२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील चार, जठारपेठ, गीता नगर व ज्योती नगर येथील प्रत्येकी दोन, तर बार्शिटाकळी, माना, राजनखेड, अकोट, बोर्डी ता. अकोट, विवरा ता. पातुर, खदान, तुकाराम चौक, बाळापुर, किर्ती नगर, श्रद्धा नगर, सिंधी कॉलनी, तोष्णीवाल लेआऊट, कपिलवस्तु नगर, जुने शहर, कौलखेड, बैदपूरा व अकोट फाइल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६४०ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,१४८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,१८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.