अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 13:00 IST2020-12-06T12:59:20+5:302020-12-06T13:00:36+5:30
Akola coronavirus News २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९६५८ वर गेली आहे.

अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार ६ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९६५८ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून आरटीपीसीआर चाचण्यांचे ६२९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये गोरक्षण रोड येथील सहा, तोष्णीवाल लेआऊट येथील तीन, खदान येथील दोन, तर न्यु खेतान नगर, विद्यूत कॉलनी, बाळापूर, सहित ता. बार्शीटाकळी, जनूना ता. बार्शीटाकळी, राजूराघाट धोत्रा, तापडीया नगर, पातूर, बार्शीटाकळी, केशवनगर, किनखेड, सिटी कोतवाली समोर, आश्रय नगर, नंदापूर ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६६६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९६५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८६९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६६६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.