Another 23 corona positive patients were found in Akola | अकोला जिल्ह्यात आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

अकोला जिल्ह्यात आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे सत्र सुरच असून, बुधवार, २८ आॅक्टोबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३१७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रामदास पेठ येथील पाच, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट व शास्त्री नगर येथील प्रत्येकी दोन, गोडबोले प्लॉट, गणेश नगर, मलकापूर, सिव्हिल लाईन, भिरडवाडी, बाळापूर, शिवणी, व्ही.एच.बी. कॉलनी, बार्शीटाकळी, मोठी उमरी, जीएमसी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

५२९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,३१७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५२९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 23 corona positive patients were found in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.