आणखी १९ जणांचा मृत्यू, ४५९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST2021-05-18T04:19:56+5:302021-05-18T04:19:56+5:30

राजंदा ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष, जवाहरनगर येथील ७४ वर्षीय महिला, डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिला, दहिहांडा ...

Another 19 died, 459 positive | आणखी १९ जणांचा मृत्यू, ४५९ पॉझिटिव्ह

आणखी १९ जणांचा मृत्यू, ४५९ पॉझिटिव्ह

राजंदा ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष, जवाहरनगर येथील ७४ वर्षीय महिला, डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिला, दहिहांडा येथील ४५ वर्षीय महिला, डोंगरगाव ता. बाळापूर येथील ६२ वर्षीय महिला, वाडेगाव ता. बाळापूर येथील ३८ वर्षीय पुरुष व तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर - २०, अकोट - ९४, बाळापूर - ०२, तेल्हारा - ३०, बार्शी टाकळी - २९, पातूर - ७३, अकोला - ९६ (अकोला ग्रामीण - ३८, अकोला मनपा क्षेत्र - ५८)

५५२ जणांना डिस्चार्ज

दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर येथून तीन, केअर हॉस्पिटल येथून सहा,

पॉलिटेक्निक कॉलेज मूर्तिजापूर येथील ४१, मुलींचे वसतिगृह देवरी अकोट येथून ५०, खैरे उम्मत हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक, गोपाळराव खेडकर कॉलेज तेल्हारा येथील १४, समाजकल्याण वसतिगृह अकोला येथून पाच, खासगी रुग्णालयांमधून १३ तर होम आयसोलेशनमधील ३४२ अशा एकूण ५५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,६६३ ॲक्टिव्ह रुगण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५०,७३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४३,१४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,६६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 19 died, 459 positive