अकोला जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:31+5:302021-02-05T06:15:31+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

अकोला जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३०६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील तीन, अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, खरप, कौलखेड, खडकी, पणन ता. अकोट, मचाणपूर ता. अकोट, पिंपळखुटा ता. अकोट, राऊतवाडी, आझाद नगर, जवाहर नगर, अजय कॉलनी व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७३२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,६८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.