आणखी १७ बळी, ५३७ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST2021-05-17T04:16:38+5:302021-05-17T04:16:38+5:30

तालुकानिहाय रुग्णसंख्या मूर्तिजापूर- ३५, अकोट- १४, बाळापूर- ६२, तेल्हारा- ४९, बार्शी टाकळी- १०, पातूर- सहा, अकोला- १७१ (अकोला ग्रामीण- ...

Another 17 victims, 537 new positive | आणखी १७ बळी, ५३७ नवे पॉझिटिव्ह

आणखी १७ बळी, ५३७ नवे पॉझिटिव्ह

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर- ३५, अकोट- १४, बाळापूर- ६२, तेल्हारा- ४९, बार्शी टाकळी- १०, पातूर- सहा, अकोला- १७१ (अकोला ग्रामीण- ३५, अकोला मनपा क्षेत्र- १३६)

५६५ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २४, आर्युवेदिक महाविद्यालय येथील१०, समाज कल्याण वसतीगृह येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १२, उपजिल्हा रुगणालय येथील दोन, खासगी रुगणालयांमधील ४९ आणि होम आयसोलेशन मधील ४६० अशा एकूण ५६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५०,२७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४२,५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 17 victims, 537 new positive