अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 15:58 IST2021-03-08T15:57:55+5:302021-03-08T15:58:07+5:30
CoronaVirus in Akola आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३७ अशा एकूण ११३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवार, ८ मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३७ अशा एकूण ११३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९,२३३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३८९ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३१३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील सहा, स्वाद बेकरी येथील पाच, जीएमडी मार्केट, कौलखेड, रामदासपेठ व भंडारज बु. येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, खडकी, कान्हेरी सरप, व्हीएचबी कॉलनी, गीता नगर, शास्त्री नगर, राम नगर, जठारपेठ, लाल बंगला, रेल्वे स्टेशन चौक, गोडबोले प्लॉट व बाळापूर प्रत्येकी प्रत्येकी दोन, तर पातूर, आदर्श कॉलनी, बाळापूर रोड, लाखोडा, रायझींग सन हॉटेल, बिर्ला कॉलनी, सिंधी कॅम्प, आळंदा, पोलिस हेडक्वॉर्टर, गोरक्षण रोड, मलकापूर, सावंतवाडी, हिंगणा फाटा, गांधी रोड, आरटीओ रोड, वाशिम बायपास, जयहिंद चौक, बाळापूर नाका, तारफैल, मुझफरपूर, खोलेश्वर, दगडी पूल, नायगाव, बैदपुरा, पातूर, रजपूतपुरा, जीएमसी, मोठी उमरी व बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
४,८९२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,२३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,९५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,८९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.