CoronaVirus अकोला जिल्ह्यात आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:55 IST2020-12-21T12:50:08+5:302020-12-21T12:55:45+5:30

CoronaVirus in Akola आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०१८४ वर पोहोचली आहे.

Another 11 positive patients were found in Akola district | CoronaVirus अकोला जिल्ह्यात आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

CoronaVirus अकोला जिल्ह्यात आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ठळक मुद्देसोमवारी ८६ अहवाल प्राप्त झाले.११ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७५ निगेटिव्ह आहेत.आतापर्यंत ३११ जणांचा मृत्यू झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख उंचावतच असून, सोमवार, २१ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०१८४ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी ८६ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ११ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७५ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये उमरी येथील तीन, निमखर्डा ता. बाळापूर व कुटासा ता. अकोट येथील प्रत्येकी दोन, तर बाळापूर, राम नगर, सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

८०६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,१८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ८०६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 11 positive patients were found in Akola district