अकोला जिल्ह्यात आणखी १०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:50 IST2021-02-13T16:50:35+5:302021-02-13T16:50:45+5:30
CoronaVirus News आणखी १०५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,२७५ वर पोहोचली आहे.

अकोला जिल्ह्यात आणखी १०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये आणखी १०५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,२७५ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४९८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २४, मुर्तीजापूर येथील १३, मोठी उमरी येथील सहा, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड,आळसी प्लॉट, जीएमसी, सिंधी कॅम्प व केशव नगर येथील प्रत्येकी तीन, न्यु खेतान नगर, तोष्णीवाल लेआऊट, तेलीपुरा, राम नगर, तापडीया नगर, साईनाथ कॉलनी व चिरानीया हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, तर वानखडे नगर, रणपिसे नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएसी क्वॉर्टर, राऊतवाडी, पातूर, रेल्वे कॉलनी, सिंधी कॉलनी, न्यु राधाकिसन प्लॉट, अकोट फैल, मनपा हिंदी शाळा, मुझफ्फर नगर, विद्यानगर, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन,सावरा ता.अकोट, बाळापूर, गायगाव, गीता नगर, रणपिसे नगर, माला कॉलनी, डाबकी रोड, संतोष नगर, देशमुख फैल, जवाहर नगर, लहान उमरी, गंगा नगर, र्किती नगर, शिवनगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
८६७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,२७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,०६६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.