चार सदस्यीय कुटुंबांनाही वार्षिक सवलत
By Admin | Updated: September 28, 2014 00:27 IST2014-09-28T00:27:07+5:302014-09-28T00:27:07+5:30
प्रवासी वाढवा अभियान : एसटी परिवहन महामंडळाचा निर्णय.

चार सदस्यीय कुटुंबांनाही वार्षिक सवलत
बुलडाणा : वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ आता चार सदस्यीय कुटुंबांनाही देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. या योजनेंतर्गत ५00 रूपयात वर्षभर दहा टक्के सवलत दरा त एसटीतून प्रवास करता येणार आहे.
जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित करून आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. नवीन निर्णयानुसार राज्य परिवहन महामंडळाने वार्षिक सवलत कार्ड योजनेच्या नूतनीकरणाचेही दर कमी केले आहेत. पहिल्या वेळी १८0, दुसर्यांदा १६0 आणि तिसर्या तसेच त्यानंतरच्या नूतनीकरणासाठी १५0 रुपये वार्षिक सवलत कार्डसाठी आकारले जाणार आहेत. याशिवाय दीड लाख रूपयांच्या विम्याचे कवच ही सवलत घेण्यार्या सर्व प्रवाशांना मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या राज्यातील ताफ्यात १७,0७७ बसेस असून, दररोज जवळपास ७२ लाख प्रवाशांची वाहतूक होते. ही सवलत योजना सर्व प्रकारच्या बससेवांसाठी लागू राहणार आहे. प्रवासी वाढवा अभियानातून एसटी महामंडळास, तसेच प्रवाशांनाही फायदा होत आहे. हे अभियान दरवर्षी राबविले जात असले, तरी यंदा ते जास्त गतीने राबविण्याचे प्रयत्न महामंडळातर्फे सुरू आहेत.