विदर्भ राज्य कॅरम संघाची घोषणा

By Admin | Updated: October 14, 2014 00:18 IST2014-10-14T00:18:20+5:302014-10-14T00:18:20+5:30

अकोला येथे ४४ व्या राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम चॅम्पियनशीपकरिता विदर्भ राज्य कॅरम संघाची घोषणा.

Announcement of Vidarbha State Carrom Team | विदर्भ राज्य कॅरम संघाची घोषणा

विदर्भ राज्य कॅरम संघाची घोषणा

अकोला: ऑल इंडिया कॅरम फेडरेशनद्वारा मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे २४ नोव्हेंबरपासून आयोजित ४४ व्या राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम चॅम्पियनशीपकरिता विदर्भ राज्य कॅरम संघाची घोषणा विदर्भ कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. खा. मो. अजहर हुसेन यांनी आज केली. महेश भवन येथे झालेल्या १५ व्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेच्या अखेरीस आतापर्यंतची कामगिरी आणि गुणांच्या आधारे संघामध्ये खेळाडूंची निवड करण्यात आली. पुरुष संघात इरशाद अहमद नागपूर, योगेश धोंगडे वाशिम, नितीन लोखंडे, नीलेश जांभूळकर, तोमेश्‍वर पराते, मोरेश्‍वर भैसारे सर्व नागपूर, व्यवस्थापक सुभाष शर्मा नागपूर, प्रशिक्षक तनवीर अहमद खान अकोला. महिला संघात अनिता वर्मा, अंजली बाथो, दीप्ती कुंभारे, प्रीती बाथो, पौर्णिमा पराते सर्व नागपूर, सोनिया वागरे अकोला, व्यवस्थापक शुभा बिल्ला, प्रशिक्षक इकबाल मोहंमद नागपूर. प्रौढ पुरुष गटात शेख मोहम्मद अकोला, मोहम्मद इम्तियाज नागपूर, प्रौढ महिला गटात आर.ए. गंधेवार, शोभा ढोले बीएसएनएल अकोला यांचा समावेश असल्याचे विदर्भ कॅरम असोसिएशनचे महासचिव प्रभजितसिंह बछेर यांनी सांगितले.

Web Title: Announcement of Vidarbha State Carrom Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.