महानगर काँग्रेस अध्यक्षांचीही घाेषणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST2021-09-03T04:19:53+5:302021-09-03T04:19:53+5:30

अकाेला : अकाेला जिल्हा काॅँग्रेस अध्यक्षांची घाेषणा करून पक्षाला चालना देण्यात आली असून, प्रलंबित असलेल्या महानगर काँग्रेस अध्यक्षांचीही लवकर ...

Announce the Metropolitan Congress President as well | महानगर काँग्रेस अध्यक्षांचीही घाेषणा करा

महानगर काँग्रेस अध्यक्षांचीही घाेषणा करा

अकाेला : अकाेला जिल्हा काॅँग्रेस अध्यक्षांची घाेषणा करून पक्षाला चालना देण्यात आली असून, प्रलंबित असलेल्या महानगर काँग्रेस अध्यक्षांचीही लवकर नियुक्ती करावी. या पदासाठी सामाजिक समीकरणांचा विचार करून मुस्लिम, मराठा समाज वगळता इतर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री प्रा. अझहर हुसेन यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्याकडे केलेल्या निवेदनात प्रा. हुसेन यांनी नमूद केले आहे की, जिल्हाध्यक्षपदी अशाेक अमानकर यांच्या रूपाने मराठा नेतृत्वाला संधी दिली असल्याने आता शहरात मध्ये मराठेतर समाजातील नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. महानगरपालिकेत निवडणूक आलेल्या काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सर्वाधिक मुस्लिम सदस्य आहेत, तसेच या समाजातील तिघांना राज्य कार्यकारिणीतही स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजालाही प्रतिनिधित्व मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केेले आहे.

Web Title: Announce the Metropolitan Congress President as well