महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 15:42 IST2019-02-15T15:41:50+5:302019-02-15T15:42:14+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर अनिल डोये रुजू झाले असून, १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी पदभार स्विकारला.

महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये रुजू
अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर अनिल डोये रुजू झाले असून, १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी पदभार स्विकारला. मुख्य अभियंता पदावर पदोन्नती होण्यापूर्वी ते भांडूप परिमंडलातील ठाणे शहर मंडल येथे अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत होते.
यापूर्वी त्यांनी अकोला परिमंडळात अधिक्षक अभियंता(पायाभूत आराखडा) पदावर कार्य केले आहे.तसेच मुख्यालय मुंबई येथे विविध पदावर काम केलेआहे. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांची त्रिपुरा विदयुत मंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी निवड झाल्यानंतर मुख्य अभियंता पदाचा प्रभार अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांचेकडे होता. आज अनिल डोये हे रुजू झाल्यानंतर त्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.