अकोला, दि. १७ : जिल्हय़ातील अंगणवाडीसेविकांचे गत तीन महिन्यांचे मानधन थकीत आहे. त्यामुळे थकीत असलेले मानधन केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील १ हजार २५१ अंगणवाड्यांच्या सेविकांकडून प्रतीक्षा केली जात आहे.महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाड्यांवर कार्यरत अंगणवाडीसेविकांना शासनामार्फत दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाते. जिल्ह्यातील सातही तालुक्यात १ हजार २५१ अंगणवाडी आहेत. या अंगणवाड्यांवर कार्यरत असलेल्या अंगणवाडीसेविकांना गत मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. मानधन थकीत असल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न अंगणवाडीसेविकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे थकीत असलेल्या मानधनाची रक्कम केव्हा मिळणार, त्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनामार्फत केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील अंगणवाडीसेविकांकडून केली जात आहे.
अंगणवाडीसेविकांचे मानधन थकीत!
By admin | Updated: August 18, 2016 02:06 IST