...अन् एसटी चढली डिव्हायडरवर; प्रवासी सुखरूप
By रवी दामोदर | Updated: September 22, 2022 16:04 IST2022-09-22T16:04:17+5:302022-09-22T16:04:49+5:30
ही घटना गुरूवार, दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रिधोरानजीक कलकत्ता धाब्याजवळ घडली.

...अन् एसटी चढली डिव्हायडरवर; प्रवासी सुखरूप
अकोला : राष्ट्रीय महामार्ग सहा क्रमांकावर मूर्तीजापूर बुलढाणा जात असलेल्या बसला मालवाहू वाहनाने कट मारल्याने एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटून बस डिव्हायडरवर चढली. या अपघातात जीवित हानी झाली नसून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना गुरूवार, दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रिधोरानजीक कलकत्ता धाब्याजवळ घडली.
एसटी महामंडळची बस क्रमांक (एमएच १३ सीयु ८३३६) ही बस मूर्तीजापुरहून बुलढाणा जात होती. रिधोरानजिक असलेल्या कलकत्ता धाब्याजवळ एका अज्ञात मालवाहू वाहनाने बसला कट मारल्याने बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस डिव्हायडरवर चढली. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान बसमधील प्रवाशांना नाग त्रासाला सामोरे जावे लागले. बसमध्ये तब्बल ७० ते ८० प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात जीवित हानी टळली.