निनावी दूरध्वनीने हावडा एक्स्प्रेसची तपासणी!

By Admin | Updated: April 26, 2016 02:07 IST2016-04-26T02:07:44+5:302016-04-26T02:07:44+5:30

खुनाची अफवा, शेगाव येथे गाडी अर्धा तास उशिरा.

Anaweel telephone the Howrah Express inspection! | निनावी दूरध्वनीने हावडा एक्स्प्रेसची तपासणी!

निनावी दूरध्वनीने हावडा एक्स्प्रेसची तपासणी!

शेगाव (जि. बुलडाणा) : १२८३३ हावडा एक्स्प्रेसमध्ये कुणाचा तरी खून झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दूरध्वनीवरुन मिळाल्यानंतर, हावडा एक्स्प्रेस शेगाव येथे थांबवून तपासणी करण्यात आली; मात्र खुनाची कुठलीही घटना घडली नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्याने अध्र्या तासानंतर गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. हावडा एक्स्प्रेसमध्ये खून झाल्याचा निनावी दूरध्वनी दूपारी १२ वाजताच्या दरम्यान भुसावळ रेल्वे पोलीसांना आला. रेल्वे पोलीसांनी तत्काळ हावडा एक्स्प्रेसचा मागोवा घेत, शेगाव रेल्वे पोलीसांना याबाबत माहिती कळविली. हावडा एक्स्प्रेस शेगाव रेल्वे स्थानकावर दुपारी १ वाजता पोहोचली असता, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्तरित्या सर्च मोहीम राबविली; मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे लक्षात आले. पोलीसांनी काही प्रवाशांचे जबाब यावेळी नोंदविले.

Web Title: Anaweel telephone the Howrah Express inspection!