आनंद जाधवचा जामीन अर्ज फेटाळला!

By Admin | Updated: February 4, 2016 01:27 IST2016-02-04T01:27:29+5:302016-02-04T01:27:29+5:30

किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी आनंद जाधव यांचा जामीण अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Anand Jadhav's bail application is rejected! | आनंद जाधवचा जामीन अर्ज फेटाळला!

आनंद जाधवचा जामीन अर्ज फेटाळला!

अकोला: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी आनंद जाधव याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. या प्रकरणातील एका आरोपीस जामीन मिळाला आहे.
जुने शहर तसेच हरिहर पेठेतील रहिवासी संतोष गवळी, संतोष कोल्हटकर, शांताबाई खरात व अमर शिरसाट यांना २0 ते ५0 हजार रुपये कर्ज देऊन त्यांना किडनी दान देण्यासाठी हतबल करणारी टोळी अकोल्यासह राज्यातील प्रत्येक शहरात कार्यरत आहे. या टोळीतीलच काही सदस्यांनी अकोल्यातील या चार जणांच्या किडनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता; मात्र ठरलेला मोबदला न दिल्याने किडनी तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला. यामध्ये देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव या दोन आरोपींना सर्वांत प्रथम अटक करण्यात आली. त्यापैकी आनंद जाधव याने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्याच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून, न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
किडनी तस्करी प्रकरणातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारात यवतमाळ, नागपूर व औरंगाबाद येथील डॉक्टरचा समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले; परंतु राजकीय दबाव पोलिसांवर असल्याने तसेच तांत्रिक मुद्दय़ांची उकल करण्यासाठी आवश्यक असलेली डॉक्टरांची मदत पाहिजे त्या प्रमाणे होत नसल्याने गुंतागुंतीचा हा तपास रखडलेला
आहे.

Web Title: Anand Jadhav's bail application is rejected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.