अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:09+5:302021-07-14T04:22:09+5:30

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे या काल अकोला दौऱ्यावर होत्या. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या ...

Amol Mitkari paralyzed | अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका

अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे या काल अकोला दौऱ्यावर होत्या. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बी फार्मसी कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाषणाचा समारोप करताना शेवटी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली… माझ्या मनाची होतीया काहिली’ हे गीत गायला सुरुवात केली. गात असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. तेथे उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

अमोल मिटकरी यांनी स्वत: एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती आता सुधारते आहे. चिंता करण्यासारखं काही नाही. सध्या कोरोनाचा काळ असल्याने कुणीही मला भेटायला येऊ नये, अशी विनंती मिटकरी यांनी कार्यकर्ते, मित्रमंडळी व हितचिंतकांना केली आहे.

Web Title: Amol Mitkari paralyzed