शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अमित शाह यांचे अकोला शहरात जल्लोषात स्वागत! स्वागत कमानी, फलक अन् रांगोळ्यांनी वेधले लक्ष

By संतोष येलकर | Updated: March 5, 2024 19:06 IST

Amit Shah In Akola: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवार, ५ मार्च रोजी अकोला दौऱ्यावर आले होते. शिवणी विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा जवळच्या हाॅटेल जलसापर्यंत शहरातील रस्त्यावर भाजपच्यावतीने शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

- संतोष येलकरअकोला - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवार, ५ मार्च रोजी अकोला दौऱ्यावर आले होते. शिवणी विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा जवळच्या हाॅटेल जलसापर्यंत शहरातील रस्त्यावर भाजपच्यावतीने शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकांसह रस्त्यांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यासोबतच त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या स्वागत कमानी, फलक आणि आकर्षक रांगोळ्यांनी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले.

पश्चिम विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक अकोल्यातील रिधोराजवळील हाॅटेल जलसा येथे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी घेतली. त्यानुषंगाने अकोल्याच्या शिवणी विमानतळावर शाह यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल,आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, अर्चना मसने,भूषण कोकाटे आदींनी शाह यांचे स्वागत केले. त्यानंतर शिवणी चौक, महाकाली चौक, अशोक वाटीकाजवळील चौक, वाशिम रोड चौक आदी प्रमुख चौकांमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने शाह यांचे स्वागत करण्यात आले. 

प्रमुख चौकांमध्ये पुष्पवृष्टी !शहरातील अशोक वाटीका चौक, लक्झरी बस स्टॅन्ड चौक, वाशिम रोड चौक आदी प्रमुख चौकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने पुष्पवृष्टी करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देवून शाह यांनी केले अभिवादन !बैठकीच्या ठिकाणी प्रस्थान करताना राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी येथील चौकात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देवून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षि शाहू महाराज, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.रणधीर सावरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे, माजी नगरसेवक विशाल इंगळे, भन्ते परितानंद, माजी नगरसेविका दिपाली जगताप, प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAkolaअकोला