शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकापेक्षा रुग्णवाहिका चालकाला अधिक वेतन; वाडेगावातील महात्मा फुले पतसंस्थेतील गैरव्यवहार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:01 IST

अकोला : वाडेगावातील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळ, व्यवस्थापकांनी मिळून चांगलीच मौज सुरू केल्याचे किस्से तालुका उपनिबंधकांच्या अहवालातून पुढे आली आहेत.

ठळक मुद्देपतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी स्वीकारून त्याचे कर्जरूपात वाटप करताना संचालक मंडळ, व्यवस्थापकाने प्रचंड मनमानी केली आहे. एखाद्याला कर्ज देण्यासाठीच्या प्रस्तावावर ठराव घेऊन मंजुरी देण्याच्या प्रक्रियेतच अस्पष्टता आहे. सभेमध्ये कर्जदार वा त्यांनी मागणी केलेली रक्कम या बाबीची शहानिशा न करता मान्यता देण्यात आली.

अकोला : वाडेगावातील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळ, व्यवस्थापकांनी मिळून चांगलीच मौज सुरू केल्याचे किस्से तालुका उपनिबंधकांच्या अहवालातून पुढे आली आहेत. त्यामध्ये कळस म्हणजे, संस्थेच्या लिपिकापेक्षाही गरज नसलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाला अधिक वेतन दिल्या जात असल्याचा विरोधाभासही पुढे आला आहे.पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी स्वीकारून त्याचे कर्जरूपात वाटप करताना संचालक मंडळ, व्यवस्थापकाने प्रचंड मनमानी केली आहे. एखाद्याला कर्ज देण्यासाठीच्या प्रस्तावावर ठराव घेऊन मंजुरी देण्याच्या प्रक्रियेतच अस्पष्टता आहे. त्यासाठी संचालक मंडळाच्या ठरावामध्ये कर्ज मागणीदाराचे नाव नसणे, त्यांनी मागणी केलेली रक्कम, त्याला मंजूर केलेली रक्कम या बाबी स्पष्टपणे नमूद न करता मोघम स्वरूपाचे ठराव मालतारण कर्ज दिल्यानंतर मंजूर केल्याचेही चौकशीत पुढे आले आहे. सभेमध्ये कर्जदार वा त्यांनी मागणी केलेली रक्कम या बाबीची शहानिशा न करता मान्यता देण्यात आली. त्यामुळे पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहाराला संचालक मंडळही तेवढेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

सेवा नियम लागू नसतानाही केले पदावनत१०३ पोते धान्याची चोरी, त्यानंतर ५० लाखांपेक्षाही अधिक रकमेचे बोगस कर्जवाटप प्रकरणी संचालक मंडळाने व्यवस्थापकाला पदावनत केले. त्या व्यवस्थापकाला कोणतीही सेवा नियम लागू नसताना ही कारवाई केली. त्याचवेळी पदावनतीनंतरच्या पदाऐवजी आधीच्या पदाचेच वेतन देण्यात आले. त्यामुळे संचालकांकडून केवळ कारवाईचा आभास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात गोदामपाल, व्यवस्थापकाला वाचवले जात आहे, असेही चौकशी अहवालात म्हटले आहे. 

बिनकामाच्या रुग्णवाहिकेवर चालकाची नियुक्तीसंस्थेची रुग्णवाहिका आहे. तिचा दैनंदिन कुठेही उपयोग होत नसल्याच्या नोंदी आहेत. त्या रुग्णवाहिकेवर असलेले चालक गजानन सुखदेव नावकार यांना वेतन दिले जाते. त्यांचे वेतन संस्थेतील लिपिक डिगांबर सुखदेव मसने यांच्या वेतनापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट करण्यात आले. या प्रकारातूनही ठेवीदारांच्या पैशांची लूट सुरू असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेला नियमित चालकाची आवश्यकता नसल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Ruralअकोला ग्रामीण