शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला दिलेला आंबेडकरांचा ‘अल्टीमेटम’ आज संपणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:48 IST

 अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला.

- राजेश शेगोकार अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला. त्यावर काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ३० जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास ३१ जानेवारी रोजी निर्णय घेण्यास वंचित बहुजन आघाडी मोकळी राहील, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्या ‘अल्टीमेटम’ची मुदत आज संपणार असून, काँग्रेसच्या भूमिकेवरच महाआघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आंबेडकरांचे मन वळविण्यास सुरुवात केली. यादरम्यान अ‍ॅड. आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्यास अनुकूलता दाखविली असली, तरी दुसरीकडे काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी गमावली नाही. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीसाठी राज्यात १२ जागा देण्यात याव्यात तसेच देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या आराखड्याची अंमलबजावणी अशा स्वरूपाचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसने गेल्या सहा महिन्यांत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अखेर अ‍ॅड. आंबेडकरांनी शेवटचा ‘अल्टीमेटम’ दिला आहे.  ‘एमआयएम’सोबतची मैत्री घट्ट अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर करून या मैत्रीचा नारळ गांधी जयंतीला औरंगाबाद येथे फोडला. भारिप-बमसं व एमआयएम या मैत्रीमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये मोठे विभाजन घडेल, या भीतीने काँग्रेसने अ‍ॅड. आंबेडकरांशी बोलणी सुरू केली; मात्र एमआयएम नको या मुद्यावर काँग्रेस ठाम आहे, तर दुसरीकडे अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबतची मैत्री घट्ट करीत राज्यभरात जाहीर सभांचा सपाटा सुरू केला आहे. या सभांमध्ये काँग्रेसवर तोंडसुख घेण्याची एकही संधी आंबेडकरांनी सोडलेली नाही, हे विशेष.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPoliticsराजकारणAkolaअकोला