ट्रकमधील अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा जप्त
By Admin | Updated: June 7, 2014 01:05 IST2014-06-07T00:56:52+5:302014-06-07T01:05:40+5:30
अकोला ट्रकमध्ये विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्या अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा जप्त

ट्रकमधील अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा जप्त
अकोला : ट्रकमध्ये विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्या अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा चोरीच्या असल्याच्या संशयावरून कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ट्रकचालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
एका ट्रकमध्ये अँल्युमिनिअम व तांब्याची तार नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशोक वाटिका चौकाजवळ आरजे ११ जीए ३0५६ क्रमांकाच्या ट्रकला कोतवाली पोलिसांनी थांबविले आणि ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये भांड्यांच्या मोडसोबतच विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्या अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा आढळून आल्या.
या तारा चोरीच्या असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. बाजारभावानुसार या तारांची एकूण किंमत १ लाख रुपये आहे. पोलिसांनी राजस्थानमधील ढोलपूर येथील राहणारा ट्रकचालक महेंद्रसिंग प्रजापत याला ताब्यात घेतले आहे. महेंद्रसिंगने हे साहित्य अमरावतीला नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस ट्रकचालकाची चौकशी करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार अनिरूद्ध आढाव यांच्या मार्गदर्शनात एएसआय रामभाऊ बंड, श्याम शर्मा, राजेंद्र तेलगोटे, शेख माजीद, नदीम खान यांनी केली.