महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्जांंचे वाटप
By Admin | Updated: September 5, 2014 01:36 IST2014-09-05T01:36:35+5:302014-09-05T01:36:35+5:30
अकोला मनपा प्रशासनाने निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी घोषित केला.

महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्जांंचे वाटप
अकोला : महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, गुरुवारी मनपा प्रशासनाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. यामध्ये ५ सप्टेंबर रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्राचे वाटप केले जाणार आहे. संबंधित उमेदवारांनी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंंं त नामनिर्देशन पत्र सादर करणे बंधनकारक आहे.
विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार येत्या १0 सप्टेंबर रोजी महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडेल. मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी १0 वाजता जिल्हाधिकारी अरुण शिंदे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. महापौर पदाचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. २0१२ मध्ये मनपाच्या निवडणुकीत अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौर पदाचे आरक्षण निघाले होते. तर आगामी अडीच वर्षांंच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. मनपा प्रशासनाने गुरुवारी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. यामध्ये ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंंत उमेदवारी अर्जाचे (नामनिर्देशन पत्र) वाटप केले जाईल. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंंत उमेदवारी अर्ज नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. उमेदवारी अर्जांंची छाननी १0 सप्टेंबर रोजी सभागृहात करण्यात येईल.
** युतीची शनिवारी बैठक
महापौर व उपमहापौर पदाचा तिढा सोडवण्यासाठी भाजप-शिवसेनेची ६ सप्टेंबर रोजी भाजप कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
** आघाडीचे लक्ष पक्षाकडे!
काँग्रेसमधून अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला महापौरपद मिळावे, याकरिता ३ सप्टेंबर रोजी काही इच्छुक नगरसेविका पतींनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावर तुम्ही आपसात ठरवा, आणि कळवा, अशी भूमिका प्रदेशाध्यक्षांनी घेतल्याची माहिती आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी लवकरच पक्ष निरीक्षकांना पाठवल्या जाईल. तर पक्ष श्रेष्ठी सुचवतील, त्यानुसार मतदान करणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून मांडल्या जात आहे.