शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
7
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
9
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
10
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
12
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
13
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
14
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
15
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
16
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
17
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
18
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
19
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधांतरी भारतीय जनता पार्टीचा आरोप

By admin | Updated: May 13, 2014 21:19 IST

सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑक्टोबर २००२ पासून कार्यान्वित झाल्यानंतर आरोग्य सेवा अधांतरी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.

अकोला : सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑक्टोबर २००२ पासून कार्यान्वित झाल्यानंतर येथील आरोग्य सेवेत कुठलाही बदल झाला नसून, वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधांतरी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. सामान्य रुग्णालय असताना असलेल्या सुविधांचाही ब˜्याबोळ या ठिकाणी करण्यात आला असून, येथील सुविधा सामान्यांना चांगल्या प्रकारे मिळाव्यात, अशी मागणीही भाजपाने केली आहे.
नागपूर आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याप्रमाणे रुग्णांना सेवा पुरवित आहे त्याचप्रमाणे अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानेही रुग्णांना अत्याधुनिक व अद्ययावत सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील महिलांना सुविधा व्हावी याकरिता वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलेली मॅमोग्राफी मशीन केवळ तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने बंद असून, यावर तंत्रज्ञाची नियुक्ती करून ही मशीन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नॅरोकंडक्टन यंत्र या ठिकाणी उपलब्ध आहे; मात्र त्याचा रुग्णांना कुठलाही उपयोग नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या एक्सरे मशीन जुन्या पद्धतीच्या असून, काळानुरूप या ठिकाणी अत्याधुनिक एक्सरे मशीन बसविण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात व प्रत्येकच वॉर्डात प्रचंड घाण साचली असून, साफसफाई अजिबात होत नसल्याचा आरोप भाजपाने केला असून, येथील साफसफाई नियमित करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात व वॉर्डात लाईट, पंखे बसविण्याची मागणीही भाजपाने केली असून, येथील कारभार अधांतरी सुरू असून, हा कारभार तातडीने सुधारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.