हिंगणा येथे भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST2021-09-21T04:21:39+5:302021-09-21T04:21:39+5:30
वाडेगाव : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणा (उजाडे) येथे सोमवारी (दि. २०) भरदिवसा घरफोडी करत पाच हजारांचा ...

हिंगणा येथे भरदिवसा घरफोडी
वाडेगाव : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणा (उजाडे) येथे सोमवारी (दि. २०) भरदिवसा घरफोडी करत पाच हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाचव्यांदा चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणा उजाडे येथील शेतकरी विनोद शिवलाल मुरुमकार यांच्या घरी भरदिवसा अज्ञात चोरट्यांने हात साफ करत पाच हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत शेतकरी विनोद मुरुमकार यांनी पातूर पोलिसांत माहिती दिली. माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून कपाटामधील नगदी ५ हजार रुपये व काही साहित्य चोरी केल्याचे समोर आले आहे.
------------
तीन महिन्यांत पाचव्यांदा चोरी
हिंगणा उजाडे येथे गेल्या तीन महिन्यात पाचव्यांदा चोरीची घटना घडली आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या घरात चोरी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.