सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अक्षय म्हसाये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:51+5:302021-05-09T04:19:51+5:30
नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम संवाद सरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये सर्व आजी-माजी व विद्यमान सरपंचांना एकत्र करण्यात ...

सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अक्षय म्हसाये
नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम संवाद सरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये सर्व आजी-माजी व विद्यमान सरपंचांना एकत्र करण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी एका नियुक्तीपत्रकाव्दारे धानोरा पाटेकर येथील अक्षय पंजाबराव म्हसाये यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
---------------------------------------
अकोटात कोविड लसीकरण नोंदणी शिबिर
अकोट : लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, त्यांना कोविड लस मिळावी, यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत मोफत लसीकरण नोंदणी शिबिर दि. ९ मेपासून दररोज सकाळी ९ वाजतापासून गजानन महाराज मंदिर परिसर येथे आयोजित केले आहे. शिवसेना गटनेते तथा नगरसेवक मनीष कराळे मित्र मंडळातर्फे ऑनलाइनवर लसीकरण नोंदणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाकरिता मंगेश करुले, श्याम जंवजाळ, प्रशांत वानखडे, बजरंग मिसळे, अवी शेलकर, अनिकेत पोतले आदी सहकार्य करीत आहेत.