आकोटमध्ये पंचरंगी लढत
By Admin | Updated: October 2, 2014 01:53 IST2014-10-02T01:53:00+5:302014-10-02T01:53:00+5:30
आकोटात ११ उमेदवार रिंगणात.

आकोटमध्ये पंचरंगी लढत
आकोट : आकोट विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी प्रकाश भारसाकळे यांना मिळाली असल्यामुळे रंगत वाढली असून, लढत आता पंचरंगी झाली आहे. बुधवारी १ ऑक्टोबरला १२ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्यामुळे येथे ११ उमेदवार रिंगणात आहेत.
आकोटमधून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार संजय गावंडे आहेत तर भाजपच्यावतीने दर्यापूर मतदारसंघाचे चार वेळा आमदार म्हणून निवडूण आलेले प्रकाश भारसाकळे आहेत. गतवेळीही प्रकाश भारसाकळे यांनी आकोट विधानसभेतून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना उमेदवारी दिली आहे. तर राकाँच्यावतीने राजू बोचे यांना संधी देण्यात आली आहे. भारिपच्यावतीने प्रदीप वानखडे रिंगणात आहेत. पाच पक्षांचे मातब्बर उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथे पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मागे घेणार्यांमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांचा समावेश आहे. यासोबतच प्रवीण काळे, नीलेश बोडखे, डॉ. मनीषा मते, गजानन दौड यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे.